खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अखिल भारतीय किसान संघ यांच्यावतीने शेतकऱ्यांची बैठक खानापूरात नुकताच पार पडली.
यावेळी बैठकीला मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय किसान संघाचे उत्तर कर्नाटक प्रांत अध्यक्ष विवेक मोरे, सुरेश हंचनाळकर उपस्थित होते.
तर बैठकीला तालुका अध्यक्ष अशोक गौडा पाटील, (चिकदिनकोप), उपाध्यक्ष शंकर पाटील (बिदर भावी) सेक्रेटरी एस एन बेढरे, जाईल सेक्रेटरी रूद्राप्पा कोडोळी, सदस्य जे बी कोचेरी, परशराम घाडी, निलेश देसाई, धाकलु बिर्जे, शशिधर सोनोली, संतोष मणेरीकर, विजय होळंकर,
यावेळी सेक्रेटरी एस एन बेडरे यांनी प्रास्ताविक केले.
विजय होळंकर यांनी पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी बैठकीत शेतीच्या कामाला मजुर मिळणे कठीण झाले याचे कारण म्हणजे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाला मजुर जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात शेत मजुर मिळणे कठीण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. खानापूर तालुका हा जंगलाने व्यापलेला तालुका आहे. त्यामुळे जंगली जनावराकडुन शेतकरी वर्गाच्या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी वनखात्याच्या आरएफओना निवेदन देण्यात यावे.
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतुन पाच शेतकऱ्यांची कमिटी करून समस्याचे निवारण करू. शेतात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी टीसीची व्यवस्था करून घेऊ,
याचबरोबर शेतात सिंद्रीय खाताना वापर करून पिक घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, शेतीची आधुनिक यंत्रणा सामुग्री, बी बियाणे, आदीचा वापर करून कमी खर्चात जास्त शेतीचे उत्पन्न घेणे यावर चर्चा करण्यात आली.
सुत्रसंचालन एस एन बेडरे यांनी केले. आभार दिपक वाळवे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta