Sunday , July 26 2026
Breaking News

हलगा येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला डिजिटल भारताचा नकाशा भेट

Spread the love

 

बेळगाव : हलगा येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला डिजिटल भारताचा नकाशा देण्यात आला. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष परशराम हनमंताचे, उपाध्यक्ष तानाजी संताजी यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांच्याकडे हा नकाशा देण्यात आला. बुधवार दिनांक 8 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेचे सहशिक्षक आर एस मोरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित त्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील म्हणाले की, हलगा येथील मराठी शाळेमध्ये हा डिजिटल भारताचा नकाशा देऊन माजी सैनिक संघटनेने उत्कृष्ट कार्य केले आहे या नकाशाच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थ्यांना शिकविण्यात मोलाची भर मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही या माध्यमातून चांगले शिक्षण मिळणार आहे, माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक कार्यामध्ये जे कार्य चालू केले आहे ते कार्य असेच पुढे राहावे व नवनवीन शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी शाळेला मदत करावी यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणार आहे. यावेळी हलगा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष परशराम हमणमंताचे, उपाध्यक्ष तानाजी संताजी, शिक्षिका एम व्ही चौगुले, ए एस बागेवाडी, एम ए देसाई, आर एस घोरपडे, व्ही जी घाटीबंदे, एस बी भोसले व शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *