खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजपतर्फे डाॅक्टर, वकिल यांच्याशी समस्या निवारण बैठक शनिवारी भाजप कार्यालयात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल होते.
भाजपा निवडणूक प्रसारक श्री. वकुंड, बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, राज्य महिला सचिव उज्वला बडवाणाचे, धनश्री सरदेसाई, वासंती बडिगेर, बाबूराव देसाई, विलास पवार इतर मान्यवर उपस्थित होते.
समस्या निवारण बैठकीला खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. डी ई नाडगौडा, डॉ. फयाज कित्तूर, तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी, ऍड. चेतन मणेरीकर, ऍड. एम आर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसार प्रमुख राजेंद्र रायका यांनी प्रास्ताविक केले.
डॉक्टर डी ई नाडगौडा समस्या निवारण बैठकीत बोलताना तालुक्यातील तळागाळातल्या जनतेच्या समस्या पक्षाच्या नेत्यांनी समजावून घेऊन त्यावर अमलबजावणी करणे गरजेचे आहे.
पाणी समस्या असो, रस्त्याची समस्या असो, गावपातळीवर समस्या असो या समस्या जो पर्यंत पक्षाच्या वतीने मार्गी लागतील नाहीत तो समाज स्थानिक पक्षाला मानणार नाही. त्या पक्षाच्या नेते मंडळी खेडोपाडी जाऊन तळागाळातील जनतेच्या अनेक समस्यांचे निवारण करा. जनता नेत्यांना विसरणार नाहीत.
यावेळी ऍड. ईश्वर घाडी यांनी सध्या भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची जगभर प्रशंसा होत आहे. तेव्हा खानापूर तालुक्यातील भाजपच्या नेत्यांनी मोदींच्या बळकटीसाठी तालुक्यातील अनेक समस्यांना मार्गी लावले पाहिजे.
जनतेच्या समस्या मार्गी लागल्यातर जनता समाधानी राहते. पक्षाचे बळ वाढते. नेतेमंडळीना उमेद येते. तेव्हा भाजप पक्षाने व नेते मंडळी नी जास्तीत जास्त विकास कामे घडवुन आणावी, असे मत व्यक्त केले.
भाजपचे निवडणूक प्रसार मोकाशी वकुंद, व उज्वला बडवाणाचे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला तालुक्यातील भाजपचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुत्रसंचालन बसु सानिकोप यांनी केले तर शेवटी अध्यक्ष संजय कुबल यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta