
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरातील सर्वे नंबर ९२/२ मध्ये नगरपंचायतीकडून गटारी, रस्ते आदी विकास कामे केली जात आहेत. असे असताना विद्या नगरातील रहिवासी निळू पाटील हे नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना व इजिनिअरना मोबाईलव्दारे विद्या नगरात विकास काम का करता. सर्वे नंबर ९२/२ ही जमिन सरकार जमा झाली आहे. जर विकास कामे केल्यास नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी धमकी देऊन काम बंद पाडविणाऱ्या निळू पाटील यांच्यावर कारवाई करू असे सांगून खानापूर सीपीआय व पीएसआय व हवालदार जयराम तसेच चीफ ऑफिसर आर के वडार, आदींनी प्रत्यक्षात पाहणी करून विद्या नगरात विकास कोणी अडथळा आणल्यास त्याची गय केली जाणार नाही. तसेच विद्या नगरात यापुढील विकास कामाला चालना मिळेल. असे सांगून विद्या नगरातील रहिवाशांना दिलासा दिला. नगरपंचायतींच्या गटारी कामाना चालना दिली. त्यामुळे विद्या नगरातील रहिवाशांतून समाधानाचे वातावरण पसरले आहे.
अधिकाऱ्यांसह विद्या नगरातील जवळपास २०० रहिवासी वर्गाला मानसिक त्रास देत आहे. त्यामुळे संबंधीत व्यक्तीवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पोलिस स्टेशन, तहसीलदार, व नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना देण्यात आले.
यावेळी अन्थोनी लोबो, मारूती गुरव, सी वाय मादार, गणपती पाटील, बसवराज गडाद, गणेश गावडा, परशराम चोपडे, प्रकाश पाटील, परशराम गुरव, मनोहर दळवी, कांचन पाटील, सारीका गुरव, राजश्री पाटील, अरूण गुरव, आदी नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta