खानापूर (प्रतिनिधी) : तिर्थकुंडे (ता. खानापूर) गावाजवळील स्वामी हाॅटेल जवळ सोमवारी दि. २० रोजी सायंकाळी गावठी दारू विकत असल्याची माहिती खानापूर पोलिसांना मिळाली.
लागलीच खानापूर पोलिसस्थानकाचे सीपीआय रामचंद्र नाईक यानी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रकाश राठोड व सहकाऱ्यांनी सापळा रचून घटनास्थळी छापा टाकला. मात्र आरोपी पोलिसांचा सुगावा लागताच पळुन जाण्यात यशस्वी झाला. मात्र पोलिसांना घटनास्थळी १५ लिटर गावठी दारू साठा सापडला.
खानापूर पोलिस स्थानकात आरोपी विरूध्द गुन्हा क्रमांक ६६/२०२३ , कलम ३२८ आयपीसी आणि ३२, ३४ कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा १९६५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस आरोपीच्या शोधार्थ आहेत.
यावेळी सीपीआय रामचंद्र नाईक, पीएसआय प्रकाश राठोड एएसआय श्री बडगेर, जे ए हम्मण्णावर, पोलिस जे आय काद्रोळी, के एम सनदी, आय एन जन्नवगोला, एम एल मुल्ला, ए एस सत्ताप्पणावर, व व्ही एम बागी आदींनी ही कारवाई केली.
खानापूर तालुक्यातील गांजा, जुगार, गावठी दारू अशा अवैद्य धंद्यावर पोलिसांची तीक्ष्ण नजर असुन कारवाई चे सत्र सुरूच आहे. त्यामुळे खानापूर पोलिसांच्या कारवाईचे खानापूर तालुक्यातील जनतेतून कौतुक होत आहे