खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पाच वर्षाच्या काळात खानापूर तालुक्यातील कंत्राटदाराना डावलून तालुक्या बाहेरील कंत्राटदाराना तालुक्याच्या आमदारानी तालुक्यातील कंत्राटदारांच्यावर अन्याय केला. याचा बदला काढण्यासाठी तालुक्याच्या स्थानिक उमेदवारालाच आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणू. अशी चर्चा रविवारी येथील शिवस्मारक सभागृहात आयोजित खानापूर तालुका सरकारी कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका सरकारी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सुभाष चलवादी होते.
व्यासपीठावर उपाध्यक्ष लक्ष्मण बोटेकर, गौरवाध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन मुतगी, खजिनदार विष्णू बेळगावकर, सदस्य रमेश सिंगनाथ, नारायण खानापूरी, एम एम सावकार, प्रकाश गावडे व इतर सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक एम एम सावकार यांनी केले.
तर उपस्थितांचे स्वागत प्रकाश गावडे यांनी केले.
यावेळी बोलताना अध्यक्ष सुभाष चलवादी म्हणाले की, सन २०१९ साली खानापूर तालुक्यातील सरकारी कंत्राटदारांच्यावर अन्याय होत असल्याबद्दल जिल्हा अधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पंचायत अधिकारी वर्गाकडे तसेच खानापूर तहसीलदार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, पी डब्ल्यू डी अधिकारी आदींच्याकडे स्थानिक कंत्राटदार सोडून तालुका बाहेरील कंत्राटदाराना कामे देऊन तालुक्यातील कंत्राटदारांच्यावर उपासमारीची पाळी आली. तेव्हा तालुक्यातील कंत्राटदाराना कामे द्यावी. अशी मागणी करत पी डब्ल्यू डी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी अधिकाऱ्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र स्थानिक आमदारानी कोणतीही चौकशी न करता आमच्याकडे दुर्लक्ष केले.
मात्र गेली चार वर्षे खानापूर तालुक्यातील सरकारी कंत्राटदारांच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. की, कंत्राटदारावर बेरोजगारी व कर्जबाजारीपणा आला याची साधी चौकशी सुध्दा केली नाही.
तालुक्या बाहेरील कंत्राटदाराना कामे देऊन लोकप्रतिनिधीनी कमिशन जास्त घेतले व तर दुसरीकडे कामाचा दर्जा घालवला.
कंत्राटदार, कामगारांच्या नावावर कामे देऊन कमिशनवर कामे केली आहेत. याची सखोल चौकशी करावी.
तालुक्यात विकास कामे निकृष्ट दर्जाची आहेत. गेल्या ४ ते ५ वर्षात पी डब्ल्यू डी, आर डी एस, पी आर ई डी मध्ये झालेल्या सर्व कामाची सबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व त्याच्यावर करावी कारवाई आदी सुचना केल्या.
मागील ३० ते ४० वर्षांत होऊन गेलेल्या माजी आमदारानी स्थानिक कंत्राटदारानाच कामे देऊन तालुक्याचा विकास घडविला. असे असताना सध्याच्या आमदारानी तालुक्या बाहेरील कंत्राटदाराना कामे देऊन तालुक्याचे वाटोळे केले.
तेव्हा येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देऊन निवडून आणण्यासाठी खानापूर तालुक्यातील सरकरी कंत्राटदार संघटनांनी चंग बांधला आहे.
अशी माहिती उपस्थित असलेल्या पत्रकारांना दिली. यावेळी शेकडो कंत्राटदार उपस्थित होते.
आभार खजिनदार विष्णू बेळगावकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta