खानापूर : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी संपली. निकाल लागले. तसे राजकारणाचे वारे बदलले. राज्यात भाजपचे सरकार येईल अशी अशा होती, मात्र राजकीय चित्र पालटले व काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता मिळविली.
परंतु खानापूर तालुक्यात राजकीय चित्र वेगळेच झाले. खानापूर तालुक्यात भाजपचा आमदार झाला आणि राज्यात सत्ता काँग्रेसची आली. मागील वेळी खानापूर तालुक्यात काँग्रेसचे आमदार होते. मात्र राज्यात सत्ता भाजपचा होती. त्यामुळे सत्ताधारी भाजप पक्ष खानापूरच्या काँग्रेस आमदारांना निधीपासून वंचीत ठेवत आहे. असे वरचेवर सांगितले जात होते.
आता राज्यात काँग्रेसची सत्ता आली. तर खानापूर तालुक्यात भाजपचा आमदार झाला. आता काँग्रेस सरकार खानापूर तालुक्याच्या विकासासाठी निधी देण्यास राजकीय हेतू ठेवील काय? अशी चर्चा तालुक्यातील जनतेतून होताना दिसत आहे.
खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका आहे. विस्तारानेही मोठा आहे. त्यातच तालुक्यात अतिपावसाळा त्यामुळे रस्त्यांची दैनिक अवस्था होते. रस्त्यासाठी किती निधी दिला तरी तो कमीच पडतो. त्यामुळे रस्त्याच्या समस्या कायमच्याच, शैक्षणिक समस्या ही नेहमीच्याच. खानापूर तालुका हा मराठी भाषिक आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या सतत असतात. अशा अनेक समस्या तालुक्यात आहेत.
आता भाजपचा आमदार तर काँग्रेस पक्षाचे सरकार तेव्हा तालुक्यात विकासाची गंगा कशी येणार हे आता पाहावे लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta