
खानापूर (प्रतिनिधी) : मोदेकोप (ता. खानापूर) गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मोदेकोप गावच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गावच्या महिलाना व नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. मोदेकोप गावात केवळ एकाच कूपनलिकेवर संपूर्ण गावाला विसंबून राहावे लागत असल्याने केवळ कूपनलिके व्यतिरिक्त कोणते स्वच्छ पाणी मिळत नाही. असे गाऱ्हाणे मोदेकोप गावच्या नागरीकांनी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याकडे मांडले. केवळ व्यक्ती माणुसकीच्या नात्यातुन गावाला मोफत पाणी पुरवठा करते. परंतू तोही अपूरा पुरवठा होत आहे.
याचबरोबर मोदेकोप गावापासून जवळ जंगलात जुनी विहीर आहे. त्या विहिरीला मे, जुन महिन्यापर्यंत भरपूर पाणी असते. याविहीरीची खोली, रूंदी वाढवुन पाण्याचा साठा वाढविल्यास पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागतो. यासाठी वनखात्याच्या सहकार्याने विहीरीचे काम केल्यास पाण्याची समस्या दूर करा, अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर यांनी केली. यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी प्रत्यक्ष विहीरीची पाहणी केली. व योग्य तो पाणी पुरवठा करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे विचार व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन तोडगा काढायला पाहिजेत. यासाठी मी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही दिली.
यावेळी बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, कल्लापा गावडा, ग्राम पंचायत समितीचे अध्यक्ष बाळू बिर्जे, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी प्रवीण सायनाक, मनोहर गावडा व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta