खानापूर : खानापूर तालुक्यातील बरगाव गावाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मंगला पुजारी (वय 30) रा. हिरेमुन्नोळी असे मृत महिलेचे नाव असून हा घातपाताचा प्रकार आहे की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
सदर महिला मागील सहा दिवसापासून बेपत्ता होती.
खानापूर पोलिसांना बरगावजवळ झुडपात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेहा शेजारी दोन आधार कार्ड व मंदिरात फोडलेला नारळ सापडला. त्यातील एक मंजुळा पुजारी तर दुसरे तिच्या नवऱ्याचे आधार कार्ड होते. प्रथमदर्शनी महिलेने विष प्राशन केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर महिलेचा नवरा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. मंजुळा ही पारिश्वाड येथील एका पेट्रोल पंपावर काम करून आपला उदरनिर्वाह करीत होती. मंजुळाच्या मृत्यूबद्दल खानापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta