खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथे बुधवारी दुपारी दरम्यान घराचा पाठीमागील दरवाजा तोडून तिजोरीतील सोने, चांदीच्या ऐवजासह रोख रक्कम मिळून 5 लाखाचा चोरट्यांनी डल्ला मारला.
याबाबत मिळालेली माहिती की, मणतुर्गा येथील अल्बेट मोनु सोज हे घरचा दरवाजा बंद करून शेतवडीकडे कामासाठी गेले होते. त्यांचे घर असोगा रोडवरील गावच्या वेशीत आहे. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यानी घरच्या पाठीमागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करून घरातील तिजोरी फोडली आहे. तिजोरीत असलेले 8 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 13 तोळे चांदी व 6 हजार रोकड चोरट्यानी लांबवली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास सोज कुटुंबीय शेताकडून येऊन पाहिले असता घरात चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनाला आला. चोरी प्रकारासंदर्भात खानापूर पोलिसात कळवण्यात आले असून पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाणी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta