Sunday , July 26 2026
Breaking News

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक

Spread the love

 

बेळगाव : हिंदवाडी येथील महावीर उद्यान जवळ एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे.

मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर सीपीआय दयानंद शेगुणाशी यांच्या देखरेखीखाली टिळकवाडी पोलिसांनी सर्व माहिती जमा करून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात यश मिळविले. बेळगाव मारुती नगर येथील रहिवासी ३५ वर्षीय गजानन पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर टिळकवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *