खानापूर : हब्बनहट्टी (जांबोटी ता. खानापूर) येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे पाण्याखाली गेले आहे. गेल्या आठवड्यापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील ओढे-नाले आणि नद्यांचे प्रमाणाबाहेर पाणी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मलप्रभा नदीच्या पाणी पात्रात कमालीची वाढ झाली आहे.
नदीच्या पात्रात वाढलेल्या पाण्यामुळे हब्बनहट्टी येथील प्रसिद्ध मारुती मंदिर पाण्याखाली गेले आहे. हब्बनहट्टीजवळील स्वयंभू मारुती मंदिरापर्यंत पाणी आल्याने देवळाचा बराच भाग पाण्याखाली गेला आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतवडीत पाणीच पाणी झाल्याने अनेक शेतकर्यांनी पेरलेले भात कुजण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta