Saturday , September 21 2024
Breaking News

खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्यावतीने ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा १२ वा वर्धापन दिन सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी श्री ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले गुरूजी होते. प्रमुख अतिथी म्हणून खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री व्ही. एम. बनोशी, राष्ट्रपती आदर्श शिक्षक व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री. व्ही. यु. देसाई गुरूजी, सचिव श्री. ए. एम. पाटील गुरूजी, श्री. एम. पी. पाटील अध्यक्ष राजा शिवछत्रपती स्मारक ट्रस्ट आणि श्री बी. बी. पाटील सर हे उपस्थित होते. यावेळी खानापूर तालुक्याचे नुतन आमदार श्री. विठ्ठलराव सोमाण्णा हलगेकर यांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी सेवानिवृत्त शिक्षक सभासद ज्यांनी वयाची ८४ वर्षे पुर्ण केलेत, त्या शिक्षकांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा म्हणून शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन खालील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
१) श्री मल्लाप्पा गणेश शिंदे, किरहलशी
२) श्री गणपती विठ्ठल पाटील, शिवोली
३) श्री महादेव लक्ष्मण पाटील, म्हाळुंगे
४) श्री मारूती व्यंकटेश हुंदरे, सन्नहोसूर
५) श्री सातेरी चाळोबा पाटील, बेकवाड
६) श्री गोपाळ कृष्णाजी पवार, कारलगा
७) श्री राजाराम लक्ष्मण पाटील, चन्नेवाडी
८) श्री गोपाळ लक्ष्मण हेब्बाळकर, तिवोली
९) श्री भिकाजी कृष्णाजी पाटील, नरसेवाडी
१०) श्री देवाप्पा उमाजी पाटील, नरसेवाडी
तसेच हेब्बाळ गावचे वयोवृद्ध ज्येष्ठ शिक्षक श्री. उमाना शंकर गुरव (वय ९६ वर्षे) आणि करंबळचे श्री देवाप्पा भरमाणा घाडी (वय ९२ वर्षे) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कुप्पटगिरी गावची कन्या कु. संचिता दशरथ पाटील हिने ९६.९६% गुण मिळवत मराठी विभागामध्ये कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सभासद श्री संभाजी बाबाजी पाटील गुरूजी कुप्पटगिरी यांची नात कु. सोनाली ज्ञानेश्वर पाटील नागुर्डे हिने ९८.४०% गुण मिळवत इंग्रजी माध्यमातून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला, तसेच श्री एम पी‌ कदम गुरूजी निडगल यांची नात कु हर्षल सुनील पाटील हिने ९४.६०% गुण मिळवले आहे. या सर्व गुणी विद्यार्थिनींचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एन. एम. पाटील गुरूजींनी केले, अहवाल वाचन श्री. ए. एम. पाटील गुरूजींनी केले. यावेळी सत्कारमूर्ती तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव सोमाण्णा हलगेकर, श्री. जी. एल. हेब्बाळकर गुरूजी, श्री. दे. भ. घाडी गुरूजी त्याचप्रमाणे गुणी विद्यार्थीनी कु. सोनाली पाटील व कु. संचिता पाटील यांनी सत्कारा दाखल मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी श्री. व्ही. एम. बनोशी, श्री. आबासाहेब दळवी, श्री. बी बी पाटील आणि समारंभाचे अध्यक्ष श्री. डी एम भोसले गुरूजींनी वर्धापन दिन व सहस्त्र चंद्र दर्शन सत्कारमूर्ती व गुणी विद्यार्थिनींच्या बाबत विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार श्री. संभाजी बाबाजी पाटील गुरूजी यांनी केले. यावेळी निवृत्त मराठी शिक्षक संघटनेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड

Spread the love    खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *