
खानापूर (सुहास पाटील) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मोठ मोठे खड्डे पडल्याची बातमी “वार्ता”मधुन प्रसिध्द होताच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डा बुजविला. मात्र इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतर लहान खड्डे आता मोठे होणार आहेत. आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होणार आहे.
संबंधित खात्याने लहान सहान खड्डे बुजविलेतर वाहनधारकांना तसेच प्रवाशाना त्रास होणार नाही. यासाठी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील उर्वरित खड्ड्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशातून होताना दिसत आहे.
खड्डे बुजविण्याचे काम संबंधित खात्याने केले तरी कामाचा दर्जा मात्र निकृष्ट दर्जाचा झाला आहे. तेव्हा काही दिवसातच खड्डे पुन्हा होतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.
तेव्हा नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी कामाचा दर्जा पाहावा. व खड्ड्यांचे काम व्यवस्थितपणे करण्याच्या सूचना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना करावे, अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta