जांबोटी : उचवडे ता. खानापूर येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. सुधीर चव्हाण यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
ऍड. सुधीर चव्हाण यांची बेळगाव बार असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हासनेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आकाश पाटील, ह भ प दशरथ पाटील, कृष्णा गुरव, शुभम पाटील, प्रशांत पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta