खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव – पणजी महामार्गावरील खानापूर शहरालगत हलकर्णी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोर्ट जवळ रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास कोर्ट, केएलई काॅलेजच्या विद्यार्थी तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
एकीकडे स्वच्छ भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रयत्न असताना खानापूर तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी याकडे डोळेझाक करून बसले आहेत.
संबंधित हलकर्णी ग्राम पंचायतीला वारंवार निवेदन देऊन काहीच उपयोग होत नाही.
याबाबत खानापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी येथील कचऱ्याबाबत आवाज उठवला आहे.
मात्र खानापूर तालुक्यातील अधिकारी असो, लोकप्रतिनिधी असो गेंड्यांच्या कातडीचे आहेत त्याना याचा काहीच परिणाम दिसून येते नाही. यावर कोणती कारवाई करावी. याच देणघेण नाही. म्हणून इतकी वर्षे बेळगाव- पणजी महामार्गावरील हलकर्णी फाट्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे, अशी चर्चा नागरिकांतून होताना दिसत आहे.