खानापूर : बिडी (ता. खानापूर) येथील सेंट होली क्रॉस पी.यू. कॉलेजतर्फे आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये बेळगावच्या सिद्धार्थ विनोद ताशिलदार आणि वैष्णवी पी. होनगेकर यांनी अभिनंदन यश मिळविले आहे.
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पीयूसी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या सिद्धार्थ तहसीलदार याने 16 -18 वर्षे आणि 40 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. तो विनायक दंडकर ताशिलदार गल्ली, श्री सोमनाथ मंदिर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक मन्नूर शाखेची वैष्णवी होनगेकर हिने 18 वर्षे आणि 45 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळविला. या दोन्ही यशस्वी कराटेपटूंना इंडियन कराटे क्लब बेळगाव आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र बी. काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.