खानापूर (वार्ता) : उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पंचायतीला दिला जाणारा गांधी ग्राम पुरस्कार यंदा बेकवाड ग्राम पंचायतीला मिळाला असून, तो पुरस्कार सोमवारी बेंगळूर येथे मोठ्या थाटात पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे यांच्याहस्ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री उमा माधवन, राज्य सचिव अंजुम परवेझ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
ग्राम पंचायत अध्यक्षा मोहिनी येळूरकर, उपाध्यक्षा शबाना मुजावर, पीडीओ नागाप्पा बन्ने यांना राज्यस्तरीय व्यासपीठावर बोलावून हा पुरस्कार देण्यात आला. नागरी समस्या वेळेत सोडवणे, पाणी, रस्ते, गटार, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अशा सर्व व्यवस्था उत्कृष्टपणे करणे तसेच पंचायतराज खात्याने घालून दिलेल्या पैलूंचे काटेकोरपणे पालन करत त्याची अंमलबजावणी करणे अशी या पुरस्काराची अट आहे. या सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर राज्यस्तरीय पाहणी पथकाला पाचारण केले जाते. त्यांच्या अहवालानंतर हा पुरस्कार जाहीर केला जातो. त्यानुसार यावेळी खानापूर तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीमध्ये बेकवाड ग्राम पंचायत या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहे. यावेळी सदस्य यललाप्पा गुरव, गजानन पाटील, गुणवंती तळवार, संजय कोलकर, परशराम मडवाळकर, नामदेव कोळेकर, रुक्मांना झुंजवाडकर, गंगू तळवार, ज्योती गुरव, नूतन भुजगुरव, सचिव महंतेश खणगावी, तपणीस हणमंत बाळेकुंद्री, रुदेप्पा गासेकर, आय. ए. जमादार, गंगाराम गुरव उपस्थित होते.