
खानापूर : खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजा विक्री सुरू आहे. नंदगड जवळील भुरूनकी क्रॉस येथे महादेव रामप्पा बेटगेरी नामक व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती नंदगड पोलिसांना मिळताच सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. यावेळी पीएसआय किरण सत्तेगिरी आणि पोलीस कर्मचारी एच. श्रीनिवासन, एन बी बेलावाडी, नागराज बजंत्री, यु .बी. सिंत्री, खानापुर तहसीलदार प्रकाश गायकवड तसेंच महसूल अधिकारी उपस्थित होते. खानापुर तालुक्यातीळ ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजा विक्री सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील तरुणाई व्यसनाधीन बनत चालली आहे. पोलीस प्रशासनाने जागरूक राहून गांजा विक्रेत्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta