खानापूर : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर हे होते.
प्रारंभी वाचनालयाचे सचिव प्रा. महादेव खोत यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले. तर वाचनालयाचे उपाध्यक्ष ह. भ. प. दशरथ पाटील यांनी उपस्थितांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर सर्व मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाच्या कपाटाला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी दहावीत प्रथम व द्वितीय आलेल्या कुमारी गायत्री बामणे अणि अनिता बोंजुरडेकर या विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेकांची मार्गदर्शनपर भाषणे झाली तर अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
याप्रसंगी शात्तुप्पा यसगोंडे, शुभम पाटील, परशराम पाटील, विठ्ठल पाटील, विकास पाटील यांच्यासह बहुसंख्य वाचक उपस्थित होते.
विकी पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर शेट्टुप्पा यसगोंडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta