खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पीयु कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2024 25 सालाच्या विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
पदवी पूर्व विभागाच्या आदेशानुसार कॉलेजमध्ये मतदार साक्षरता संघ स्थापन करण्यात आला असून या संघाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व आणि योग्य उमेदवार निवडीचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे मतदार साक्षरता संघाचे अध्यक्ष प्रा. एन. व्ही. पाटील यांनी सांगितले.
डीएमएस पीयु कॉलेज नंदगडमध्ये निवडणूक घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपली नावे नोंदवण्यासाठी सूचना करण्यात आली होती त्यानुसार दोन दिवसापूर्वी विद्यार्थ्यांनी उमेदवार म्हणून आपली नांवे नोंदविली होती. त्यानंतर कॉलेजच्या आवारात लोकसभा आणि विधानसभेसाठी ज्याप्रमाणे निवडणूक घेतली जाते त्याप्रमाणे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. प्राचार्या दीपा हन्नूरकर यांनी निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडावी अशी सूचना विद्यार्थ्यांना केली. या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. एन. व्ही. पाटील, प्रा. आय. पी. गावडे, प्रा. राणी मडवळकर, प्रा. एम. आर. मिराशी, प्रा. एम. एम. पुजार यांनी काम पाहिले तर मतमोजणी अधिकारी म्हणून प्रा. बी. आर. देसाई, प्रा. एन. टी. पाटील, प्रा. अनिल कांबळे, शारीरिक शिक्षक विजय बेडरे, एम. टी. पाटील, मोहन धबाले यांनी काम पाहिले. मतमोजणी होताच निकाल जाहीर करण्यात आला.
विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ पुढील प्रमाणे जनरल सेक्रेटरी मधुसूदन पाटील, डेप्युटी जनरल सेक्रेटरी सौंदर्य देगावकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी संगीता भुजगुरव, सांस्कृतिक मंत्री सलोनी करडी, शिस्त मंत्री नवनाथ खानापूरकर, सहल मंत्री सुरज पाटील, क्रीडामंत्री आदित्य पाटील, पीयुसी प्रथम वर्ष वर्ग प्रतिनिधी गजानन सावंत, पीयुसी द्वितीय वर्ष वर्ग प्रतिनिधी शुभम कोलेकर यांची निवड करण्यात आली.