Wednesday , March 4 2026
Breaking News

देवराई गावाजवळ शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील देवराई गावाजवळ सोमवारी सायंकाळी गुरे चारून घरी परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. अस्वलाने गावातील शेतकरी नारायण चौरी (65) यांच्यावर मागून हल्ला केला. त्यांच्या पाठीला व डोक्याला दुखापत केली.

ही घटना नागरगाळी वनपरिक्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली, नारायण यांच्या ओरडण्याच्या आवाजाने गावकऱ्यांनी अस्वलाच्या दिशेने आरडाओरडा करताच अस्वल पळून गेले. जखमी नारायण यांना ग्रामस्थांनी खासगी वाहनातून नंदगड येथील आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार केले. घटनेची माहिती मिळताच एसीएफ सुनीता निंबर्गी आणि आरएफओ नागराज बलेहोसूर यांनी नंदगड रुग्णालयात जाऊन नारायणला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *