
खानापूर : नंदगड येथील डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्टेशन नंदगडचे सी.पी.आय श्री. एस. सी. पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण शिक्षण घेत असताना कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही वाईट मार्गाच्या आहारी जाऊ नये जेणे करून आपले शैक्षणिक जीवन उद्भवस्त होऊ शकते. तसेच समाजामध्ये वावरत असताना शिक्षक, ज्येष्ठ, आई, वडील याच्या अज्ञा पालन करणे जरुरीचे आहे, तसेच आपल्या देशासाठी सर्वस्व अपर्ण करणाऱ्या महापुरुषांप्रमाणे त्याचे विचारांचे स्मरण करून आपला समाज, राष्ट्र व सर्व धर्मांचा प्रति आदर राखला पाहिजे त्यामुळे गावातील, देशातील एकता राहील. तसेच आज काल स्त्रियांच्या बाबतीत लैंगिक अत्याचारांचे प्रकार घडत आहेत तरी कॉलेजला येता जाताना विद्यार्थिनींनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सावधरीतीने कुणावर विश्वास ठेवू नये जेणे करून शोषण होणार नाही. तरुणांनी पण कुठल्या पण वाईट व्यसनाच्या अधिन होऊन आपले जीवन व्यर्थ करू नये.तसेच प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, स्मार्ट मोबाईल याचा शैक्षिणक अभ्यासासाठी चांगला उपयोग करून घ्यावा. आपल्या जीवनामध्ये चांगल्या संस्कारांचे अनुकरण करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या दीपा हनूरकर तर सूत्रसंचालन प्राध्यापक श्री एम. एम. पुजार यांनी केले. आभार प्राध्यापक श्री. एन. व्ही. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला पोलीस निरिक्षक श्री. एस. एस. बदामी, श्री. सुदेश दलाल, प्राध्यापक, शिक्षकेतर, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थितीत होते.
Belgaum Varta Belgaum Varta