खानापूर : मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी गावचे वतनदार पाटील श्री. सुभाष गणपती पाटील व मानकरी विष्णू गुरव पुजारी, जोतिबा दत्तू गुरव आणि श्री. ज्ञानेश्वर विष्णू देसाई यांच्या हस्ते पार पडले. सुरुवातीला कळस बांधकाम पूजन करण्यात आले. यावेळी जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. आबासाहेब दळवी, लैला शुगर खानापूरचे केन मॅनेजर श्री. बाळासाहेब शेलार, प्रकाश पाटील, दत्तू पाटील, शांताराम पाटील, खजिनदार श्री. प्रकाश गुरव, सेक्रेटरी श्री. मल्लाप्पा देवलकर, दीपक पाटील, विजय भटवाडकर, बळवंत देसाई, मर्याप्पा देवकरी, श्री. रामलिंग चोर्लेकर, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे, नारायण गुंडपीकर, तुकाराम गुंडपीकर, नागेश पाटील, नूतन गुरव, श्रीपाद देवकरी, गजानन गुरव, कल्लाप्पा पाटील, रामचंद्र पाटील, मारुती पाटील, नारायण पाटील, प्रेमानंद पाटील, कृष्णा पाटील आणि गावकरी उपस्थित होते.