खानापूर : खानापूर शहरातील नूतन हायटेक बस स्थानकातील इमारतीत उभारण्यात आलेल्या श्री गणेश हॉटेल कॅन्टींगचा शुभारंभ उद्या सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सदर कॅन्टींगचे उद्घाटन ऑल इंडिया काँग्रेस पार्टीच्या सचिव तसेच खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.
सदर श्री गणेश हॉटेल कँटीन हे अद्यावत सुविधा सह जनतेच्या सेवेत राहणार आहे. या ठिकाणी माफक दरात चहा, कॉफी, इडली, डोसा पावभाजी, पुरी भाजी, उपमा, मिसळपाव, भजी असे विविध चविष्ट पदार्थ राहणार आहेत. सदर हॉटेल मंगळवारपासून सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहणार असून याचा सार्वजनिक आणि लाभ घ्यावा तसेच उद्या सोमवार दि. 9 रोजी होणाऱ्या हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन हॉटेलच्या व्यवस्थापकानी केले आहे.