
खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा येथे आपल्या शेतातील फणसाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील नेरसा येथे घडली आहे. सदर घटना गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे. परंतु शुक्रवारी सकाळी उजेडात आली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नेरसा येथील रहिवासी निलेश हैबतराव (बाळू) देसाई (वय 43 वर्ष) सध्या राहणार शिवाजीनगर खानापूर हे गुरुवारी आपल्या नेरसा गावातील शेताकडे जाऊन येतो म्हणून गेले होते. परंतु ते रात्री खानापूर येथील घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीला आपले पती गावाकडील आपल्या आई-वडिलांच्या घरी वस्तीला राहिले असतील अशी समजूत झाली. त्यामुळे त्यांनी सकाळी आपल्या पतीला फोन केला असता फोन लागला नाही. त्यामुळे त्यांनी नेरसा येथील आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना याबाबत कळविले असता त्यांनी शेताकडे जाऊन पाहिले असता ही घटना उजेडात आली.
त्यानंतर ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह खानापूर येथील शासकीय दवाखान्यात आणण्यात आला व त्या ठिकाणी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर नेरसा या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta