खानापूर : खानापूरच्या तहसीलदारपदी दुंडाप्पा कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापदावर असलेले तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर लोकायुक्तांचा छापा पडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, या कारवाईवर त्यांनी न्यायालायात धाव घेऊन स्थगिती आणली होती. मात्र, सोमवारी राज्यातील 19 तहसीलदारांच्या बदली करण्यात आले असल्याचे आदेश महसूल खात्याच्या वतीने काढण्यात आले आहेत. यामध्ये दुंडाप्पा कुमार यांचा समावेश आहे. सध्या ते यादगीर जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रेड टू तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी अथणी तहसीलदार कार्यालयातही काम केले आहे. दरम्यान, प्रकाश गायकवाड यांना अद्याप कोणतेही पद देण्यात आले नाही.
दुंडाप्पा कुमार हे मूळचे मुधोळ तालुक्यातील इंगळगी गावचे असून माजी सैनिक देखील आहेत. 2014 बॅचचे केएएस अधिकारी आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta