

नवी दिल्ली : आज अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात “संघटन सृजन” तेलंगणा कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी सादर केला. हा अहवाल काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. यावेळी तेलंगणा प्रभारी मिनाक्षी नटराजन तसेच नॅशनल वॉर रूम प्रभारी सेन्थील जी. उपस्थित होते.
डॉ. निंबाळकर यांनी दिवाळीपूर्वी उत्तराखंड राज्याचा रिपोर्ट सादर केला होता, तर दिवाळीनंतर लगेचच आज तेलंगणा चा रिपोर्ट सादर करून पुन्हा एकदा संघटन कार्यातली त्यांची तत्परता आणि जबाबदारी अधोरेखित केली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीचे डॉ. निंबाळकर प्रामाणिकपणे पालन करत आहेत. त्यांच्या कार्यशैलीवर हायकमांडचा पूर्ण विश्वास असल्यानेच त्यांना सातत्याने नव्या जबाबदाऱ्या सोपविल्या जात आहेत. पक्ष संघटनेचे काम देशपातळीवर सांभाळतानाही त्या खानापूर तालुक्याकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
स्थानिक कार्यकर्त्यांचा व जनतेचा डॉ. निंबाळकर यांच्यावर अपार विश्वास असून, पक्ष हायकमांडचेसुद्धा त्यांच्यावर तेवढेच प्रेम आहे. काहीजणांनी नकारात्मक बोलले तरी त्या त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम निष्ठेने आणि शांततेने करत राहतात. म्हणूनच आज त्या हायकमांडच्या जवळ असून पक्षात एक विश्वासार्ह आणि प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
Belgaum Varta Belgaum Varta