Monday , March 9 2026
Breaking News

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ

Spread the love

 

खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रम श्री. रायाप्पा कालमनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. यानंतर सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले व श्री. जोतिबा नावलकर व मुख्याध्यापक सी एस कदम सर यांच्या शुभहस्ते छत्रपती शाहू महाराज व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित आमचे स्वागत व परिचय श्री. एस आय काकतकर सरांनी करवून दिला. यानंतर आपल्या प्रास्ताविकेतून मुख्याध्यापक सी एस कदम सरांनी शाळेचा प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले. शैक्षणिक वर्षातील वार्षिक अहवालाचे वाचन श्री. एन व्ही पाटील सरांनी केले. वार्षिक तसेच विविध स्तरावरती झालेल्या खेळाडूंची पारितोषिक वितरण क्रीडा शिक्षक चापगावकर सरांनी मान्यवरांच्या शुभहस्ते करविले विविध स्तरात विविध यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. यावर्षीची जनरल चॅम्पियनशिप मुलांच्या मध्ये साक्षात धोंडीबा बैलूरकर व मुलींच्या मध्ये सरिता राजाराम देसाई यांनी मिळविली. या सदिच्छा समारंभानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी विविध स्तरावरती मिळवलेले यश आणि त्यांच्या कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने श्री. मुकुंद देसाई निवृत्त सैनिक, श्री. तातोबा देसाई निवृत्त भारतीय सैनिक, भाग्यश्री भरमानी मुळीक आयटीबीपी सैनिक, लक्ष्मण देसाई, शिक्षक श्री टी बी मजगावि यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राथमिक शाळा ओतळीचे मुख्याध्यापक प्राथमिक राज्य कार्यकारणी संघटनेचे संचालक आदरणीय के एच कौंदलकर सर यांनी आपले मौलिक विचार मांडताना विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करण्यासाठी कष्ट प्रामाणिकपणा आणि जिद्द यांचा मेळ घातला पाहिजेत त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांचा सन्मान त्यांच्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर आपल्या सोबत ठेवून आपलं आयुष्य साकार करण्यासाठी त्याचा उपयोग करावा असे नमूद केले. प्रमुख वक्ते म्हणून दत्ता कणबर्गी यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांची दाखले देत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण जिद्दीने व जिज्ञासू वृत्तीने अभ्यास करावा आणि यशाची शिखरे गाठावी असे म्हणत दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा समारंभा निमित्त इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनीनी आपली भाषणे सादर केली. आपल्या भाषणातून त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते दत्ता कणबर्गी यांनी दिलेल्या 50 हजार रुपयांच्या पुस्तक देणगीचे वितरण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता स्वरचित व हस्तलिखित उमंग भाग दोन चे प्रकाशन करण्यात आले. आपल्या मनोगतात चेअरमन तुकाराम हनमंतराव साबळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होण्याची सूत्रे घालून दिली तसेच विद्यार्थ्यांनी शाळा आपली समजून कायमस्वरूपी शाळेशी आपले नाते अधिक दृढ करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्रातील व परीक्षेच्या यशासाठी विविध मान्यवरांनी तसेच श्रीमती व्ही. एल चौगुले टीचर यांनी बक्षीस जाहीर केली चौगुले टीचर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या संस्कारांची शिदोरी कायम सोबत ठेवावी तसेच आपल्या शिक्षकांनी, आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा योग्य वापर करावा असे सांगितले. या कार्यक्रमाला विविध स्तरातील मान्यवर शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य गावकरी पालक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए जे सावंत सरांनी केले व आभार श्री एन व्ही पाटील सरांनी मांडले.

About Belgaum Varta

Check Also

तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा (निरोप) समारंभ

Spread the love  खानापूर : आज दिनांक 07 मार्च 2026, श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *