खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतच्यावतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून जवळपास २ लाख ५३ हजार रूपये खर्चून बेळगाव- पणजी महामार्गाजवळील इदलहोंड क्राॅसवर इदलहोंड गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर कमान उभारण्यात आली आहे.
या कमानीचे उद्घाटन सोमवारी दि. ९ रोजी पार पडले.
याप्रसंगी इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगापा बाचोळकर आणि ग्राम पंचायतीचे पीडीओ बळीराम कृष्णा देसाई यांच्या हस्ते फित कापून नुतन कमानीचे उद्घाटन केले.
या कमानीच्या उद्घाटन कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य उदयराव पाटील, यल्लापा होसुरकर, भोमाजी यळ्ळूरकर, परशराम कुंभार, सदस्या लक्ष्मी सुतार, सुमन कोलकार तसेच या भागातील नागरीक म्हात्रू धबाले, ग्राम पंचायतीचे कर्मचारी वर्ग, कंत्राटदार नागाप्पा बाबीचे, मेस्त्री रमेश होनगेकर, रंगकाम केलेले यल्लापा कदम, तसेच इदलहोंड ग्राम पंचायतीच्या हद्दीतील विविध गावचे नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील यांनी ही भेट देऊन कमानीच्या कामाबदल समाधान व्यक्त केले. ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्याच्या कामाचे कौतुक केले.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …