Wednesday , March 4 2026
Breaking News

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे चिगुळे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love

खानापूर : खानापूर तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या दि. जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने नेहमीच सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर अनेक बाबतीत सहकार्य केलेले आहे. विशेषत: देशाची भावी पिढी शैक्षणिक बाबतीत पुढे गेली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते. त्यानुसार यावर्षी पहिल्या टप्प्यात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्याचा उपक्रम राबविताना चिगुळे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती जांबोटी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी दिली.
जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने सोमवार दि. 4 जुलै रोजी चिगुळे येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर, उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, संचालक मनोहर डांगे, पांडुरंग नाईक, आप पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरु पाटील, सेवानिवृत्त सैनिक गणपत गावडे, कृष्णा गावडे, सोसायटीचे व्यवस्थापक विष्णू पवार व चिगुळे शाळा कमिटीचे सदस्य उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोरल यांनी स्वागत केले तर शिक्षिका श्रीमती पवार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *