खानापूर (विनायक कुंभार) : कृषी सम्बधित खात्यांच्या विविध योजनांची माहिती मिळणाऱ्या समग्र कृषी अभियानाला आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते चालना देण्यात आली. यावेळी आमदार निंबाळकर यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले
मुख्यमंत्री रयत योजनेखाली शेतकऱ्याच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. संयुक्त कृषी संचालक शिवनगौडा पाटील यांनी कृषी रयत संकल्पनेची माहिती दिली. यावेळी आमदार निंबाळकर यांच्या हस्ते ड्रोनद्वारे नॅनो युरियाची फवारणी करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला तसेच अबोला जैविक खत ही देण्यात आले.
यावेळी कृषी उपसंचालक एच. डी. कोळेकर, वरिष्ठ फलोत्पादन संचालक श्यामंत, पीडिओ बने आदीसह कृषी अधिकारी उपस्थित होते. एस. एस. पवाडी यांनी सूत्रसंचालन केले. महेश सडेकर यांनी अभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta