उपाध्यक्ष विनायक मुतगेकरांनी केली मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिशय दुर्गम भागातील निलावडे ग्राम पंचायती च्या हद्दीतील गवळीवाडा जोगमठ व कबनाळीत अंगणवाडीची सोय करावी, अशी मागणी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष व खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी गवळीवाडा येथे भेट देऊन केली.
खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम अशा भागातील गवळीवाडा जोगमठ येथे 100 लोक वस्तीची 25 घरे आहेत. या कुटुंबांची 3 ते 5 वर्षाखालील जवळपास 20 ते 25 मुले आहेत. परंतु या मुलांना अंगणवाडीची सोय नाही.
त्यामुळे अंगणवाडीवीना मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षणासाठी निलावडे येथे पायी चालत जावे लागते. परंतु घनदाट जंगलातून चालत जाताना विद्यार्थी वर्गाला जंगली प्राण्यांचे भय आहे. त्यामुळे अंगणवाडी साठी बालकाना जंगलातून बाहेर पाठविणे शक्य नाही. तेव्हा सबंधित अंगणवाडी खात्याच्या सीडीपीओ राममूर्ती के. व्ही. यांनी अंगणवाडीची मंजुरी करून मुलांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
गवळीवाडा, जोगमठ भागातील नागरिकांचा गुरे पाळणे व दुध व्यवसाय इतकाच व्यवसाय आहे. याकडे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी कधी ढुंकूनही पाहिले नाही.
त्याचबरोबर कबनाळीतही अशीच परिस्थिती आहे. तेव्हा गवळीवाडा, जोगमठ, कबनाळीत अंगणवाडीची सोय करावी, अशी मागणी केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta