माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) : भाषिक अल्पसंख्याक कायद्याची कर्नाटक सरकारकडून पायमल्ली होत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उद्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. या ठिय्या आंदोलनाला खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने उपस्थित रहाण्याचे आवाहन माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी आदींकडून तालुक्यात जागृती करण्यात आली आहे. दरम्यान सतत पाऊस पडत असल्याने ठिय्या आंदोलनास येताना मराठी बांधवांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta