खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात सालाबादप्रमाणे यंदाही पारायण सोहळ्याला उत्साहात सुरूवात झाली.
यानिमित्ताने दररोज पहाटे काकड आरती, नित्य पूजा, ज्ञानेश्वरी अध्याय वाचन, गाथ्यावरील भजन, भारूड, आदी कार्यक्रम होऊन गुरुवारी रिंगन सोहळा होऊन शुक्रवारी काला किर्तन, दिंडी सोहळा होऊन महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी वारकरी, संताच्या उपस्थित माजी आमदार अरविंद पाटील, विठ्ठल हलगेकर आदींच्या हस्ते महाप्रसादाचे पुजन करण्यात आले.
यावेळी महाप्रसादाला खानापूर शहरासह तालुक्यातील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.
Belgaum Varta Belgaum Varta