खानापूर : शहरातील एंजल फाउंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील काटगाळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा व अंगणवाडी मध्ये खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी नुकतीच काटगाळी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा आणि अंगणवाडी क्र. 49 ला सदिच्छा भेट देऊन तेथील शिक्षक वृंदाच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी त्यांना खाऊचे वाटप केले. याप्रसंगी मीनाताई यांच्या समवेत असलेल्या प्रज्ञा शिंदे व सुजाता मिसाळ यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी भकतुरी सहाय्यक शिक्षिका डॉ. दीपा हंडे, संजय पाटील, श्रीकांत पाटील, संग्रहिता पाटील, विकास कांबळे, दिनेश श्रेयकर व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सदर उपक्रमाबद्दल छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून शाळा मुख्याध्यापकांनी एंजल फाउंडेशनचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta