Monday , December 8 2025
Breaking News

दोड्डहोसूर, निडगल, तोपिनकट्टीवासीय समितीच्या सदैव पाठीशी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अष्टप्रतिनिधी मंडळाचा दौरा दि. २१/११/२०२२ रोजी रात्री ७ वाजता दोड्डहोसूर येथे गावचे प्रतिष्ठीत नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. नारायण महादेव पाटील गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मधू परशराम पाटील, रवळू पाटील, तुकाराम पाटील, देवाप्पा पाटील, संजय पाटील, कल्लाप्पा मादार, शंकर पाटील, ईराप्पा पाटील, जयवंत पाटील, गोपाळ तिओलकर, परशराम कोलकार, इत्यादी दोड्डहोसूरवासीयांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, गोपाळराव देसाई, आबासाहेब दळवी, नारायण कापोलकर, मुरलीधर पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, रमेश धबाले, अमृत पाटील इत्यादींच्या समवेत महाराष्ट्र एकीकरण समितीची एकी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व आपल्या गावातून दोन प्रतिनिधी कार्यकारिणीवर पाठविण्याची जबाबदारी सभेचे नारायण पाटील यांनी घेतली. सदरी सभा मारुती मंदिर दोड्डहोसूर येथे झाली. त्यानंतर रात्री आठ वाजता निडगल येथे श्री मारुती मंदीर येथे बैठक झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी तानाजीराव कदम होते. यावेळी गावातील दिगंबर देसाई, परशराम कदम, राजू कदम, यल्लाप्पा कदम, प्रवीण कदम, यल्लाप्पा पी. कदम, महेश कदम, मनोहर गुंजीकर, परशराम अल्लोळकर, मल्लाप्पा पाटील, निंगाप्पा पाटील, प्रभू कदम, पुंडलीक पाटील, रवळू कदम, शिवाजी कदम, गणपती कदम, पिराजी कदम, रवळू धामणेकर इत्यादींनी खानापूर तालुक्याच्या म. ए. समितीच्या बळकटीसाठी आपण कटीबध्द राहू असे पंचायत सदस्य प्रवीण पाटील व तानाजीराव कदम यांनी जाहीर करून आपल्या गावातील दोन सदस्य कार्यकारिणीवर पाठविण्याचे मान्य केले. त्यानंतर रात्री नऊ वाजता तोपिनकट्टी येथे श्री महादेव मंदिरामध्ये बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृष्णा सोमाण्णा उत्तुरकर हे होते. या बैठकीला गावातील महेश करंबळकर, मर्‍याप्पा उचगांवकर, हुवाप्पा गुरव, नागराज निलजकर, देवाप्पा गुरव, बाबाजी देसाई, अशोक गुरव, मोहन गुरव, रमेश सुतार, भीमसेन करंबळकर, ज्योतिबा करंबळकर, मल्हारी खांबले, परशराम देवलतकर, अप्पा हलगेकर, कल्लाप्पा बाचोळकर, बाळाराम शहापूरकर, वैजू खांबले इत्यादींनी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बळकटीकरण संदर्भात विचार व्यक्त केले. आपल्या गावातून कार्यकारिणीवर चार सदस्य पाठविण्याचे मान्य केले. बैठकीमध्ये आभार मल्हारी खांबले गुरुजींनी मानले. या तिन्ही गावांमध्ये समितीचे नेतेमंडळी हजर होती.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *