Friday , November 22 2024
Breaking News

शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलनाला हिंसक वळण; वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलकांमध्ये हाणामारी

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एकेक करून कारखान्याची धुरांडी सुरु होत असतानाच शिरोळ तालुक्यात मात्र अजूनही आंदोलनाचे लोण कायम आहे. तालुक्यात आज ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले. ऊस वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हाणामारी झाली. शिरटी फाट्यावर हा सगळा घडला. आंदोलन अंकुशकडून शिरटी फाट्यावर वाहतूक रोखण्यात येत होती. त्यामुळे कारखाना समर्थकही त्या ठिकाणी दाखल झाले. समर्थकांकडून ऊस वाहतूक करणारी वाहन पुढे सोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते ट्रॅक्टरसमोर आडवे पडले. या प्रकारानंतरही वाहने रेटण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जोरदार हाणामारी झाली.

कोल्हापूर जिल्ह्यात 17 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील 17 कारखान्यांमध्ये गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस लांबल्याने आणि तसेच शिवारामध्ये पाणी साचल्याने ऊसतोड लांबली. गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने धुराडी पेटण्यास सुरुवात झाली आहे.
यावर्षीच्या हंगामासाठी 10.25 रिकव्हरीला प्रति टन 3 हजार 50 रुपये दर निश्चित केला गेला आहे. यापेक्षा जास्त दर द्यायचा असेल तर संबंधित कारखान्याने तो जाहीर करून हंगाम सुरू करण्यास सूचना साखर आयुक्तांनी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी पहिल्या उचलीची घोषणा केली आहे. हंगाम संपल्यानंतर शेवटी मिळणार्‍या उताऱ्याच्या आधारावर उर्वरित रक्कम द्यायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 सहकारी कारखाने व खासगी पाच गाळप परवाना मिळाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *