Sunday , September 20 2026
Breaking News

हर हर महादेव चित्रपटावरुन संभाजीराजे संतापले!

Spread the love

 

मुंबई : ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. त्याचा आनंद आहे. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड चालणार नाहीत, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेल्या हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचा विपर्यास चालणार नाही. मराठा लाईट इनफन्ट्री च घोषवाक्य हर हर महादेव आहे. त्याचा अपमान नको. तसेच वेडात मराठे वीर दौडले सातचा फोटो बघा. गाठ संभाजी छत्रपतींशी आहे, हे लक्षात ठेवा असेही ते म्हणाले.
एकाही मावळाच्या डोक्यावर पगडी नाही हा मोठा अपमान आहे. त्यामुळे सगळ्या प्रोड्युसरला इशारा आहे. हर हर महादेववर कायदेशीर दावा करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. तसेच माझे सहकार्य असल्याचे सिनेमांत लिहीले आहे. मात्र, चुक आपली आहे. आपण वाचत नाही. खरा इतिहास वाचायला हवा. कोण आडवं आलं तर पुढचं पुढे बघा, असा इशाराही त्यांनी दिला.
नुकताच हर हर महादेव हा मराठीतील पहिला बहुभाषिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी वेडात मराठी वीर दौडले सात या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 2023च्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मराठीतील दुसरा बहुभाषिक सिनेमा असून मराठीसह हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता खिलाडी अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *