Sunday , July 26 2026
Breaking News

राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे यश

Spread the love

 

बेळगाव : कोलार येथील शासकीय पीयूसी कॉलेजमध्ये दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगाव येथील डी वाय एस स्पोर्टस्च्या खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले आहे.

बेळगावच्या खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत नऊ सुवर्ण आणि तीन कास्यपदकाची कमाई केली आहे.

ऐश्वर्या बी. 44 किलो वजन गटात सुवर्णपदक, रक्षिता कोमर 52 किलो वजन गटात सुवर्णपदक, राधिका डुकरे 70 किलो वजन गटात सुवर्णपदक, साईश्वरी कुडचवाडकर 70 किलो वजन गटात सुवर्णपदक, शितल 57 किलो वजन गटात कांस्यपदक, तनिषा दोघांनी 63 किलो वजन गटात कांस्यपदक, मुलांच्या गटात प्रकाश येनतेत्त ५५ किलो गटात सुवर्णपदक, अरुण माळी 60 किलो वजन गटात सुवर्णपदक, भरमाप्पा दलवाई 66 किलो वजन गटात सुवर्णपदक,
सौरभ पाटील 73 किलो वजन गटात सुवर्णपदक, रोहन बी एस. 81 किलो गटात सुवर्णपदक, प्रवीण सुतार यांनी ५५ किलो वजन गटात कांस्यपदक.

राज्यस्तावरील स्पर्धेत पदक मिळवलेल्या बेळगावच्या या खेळाडूंची आता नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना ज्युडो कोच रोहीणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *