
कोल्हापूर : आजाराला कंटाळून (५५ वर्षीय) चांदी व्यापाऱ्याने पिस्तुलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज (मंगळवार) सकाळी हुपरी येथे घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हुपरी येथील चांदी व्यापारी कोरोनाबाधित होता. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. त्यांना नुकताच डिस्चार्जही मिळाला होता. मात्र आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःवर पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनी घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास सुरु आहे.
Belgaum Varta Belgaum Varta