मुंबई : फुटीरतावादी लोक शिवसेनेत नकोत. त्यांना आता माफ करणार नाही. ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे, असे स्पषट करत बंडखोर एकनाथ शिंदे गटातील १५ ते १६ आमदार संपर्कात आहेत, असा दावा युवासेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (दि.२६) येथे केला. ते सांताक्रुझ येथील युवासेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदेना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. याबाबत त्यांना मे महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारणा केली होती. परंतु, जे व्हायचे ते २० जूनला झाले. आणि त्यांनी बंडखोरी केली. आमदारांना फरपटत सुरतला नेले. पण महाराष्ट्रात घाण साचून नये म्हणून पर्यावरण मंत्री म्हणून काम करत आहे. आता शिवसेनेतून घाण गेल्याचा आनंद आहे.
बंडखोर आमदारांना सुरत आणि गुवाहटी येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांचा खर्च कोण करत आहे. त्यांना सुरक्षा पुरवली जात आहे, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. बंडखोरांमध्ये महाराष्ट्रात राहण्याची हिंमत नाही. म्हणून ते सुरतेला पळाले. पण ज्यांना यायचे आहे, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta