मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये नव्यानं सर्व पदांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेतील प्रमुखपद जे नेहमीच खास राहिलं आहे. त्या शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेनापक्षप्रमुख या पदाबाबत मात्र कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. एकूणच असं कोणतंही नवं पद या गटानं तयार केलेलं नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाची आज हॉटेल ट्रायडंट इथं बैठक पार पडली या बैठकीत ही नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे 14 खासदारही उपस्थित होते. यामध्ये शिवसेना मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी, नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, शिवाजीराव अढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा यांनी निवड करण्यात आली आहे. तर लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे हे कायम राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta