कोल्हापूर : विशाळगड येथील विषयाशी मी अवगत आहे. यासंदर्भात आपण लक्ष घालू आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊन असे आश्वासन, पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दिले. विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, पुरातत्व खात्याचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य श्री. बाबासाहेब भोपळे यांनी वारंवार बैठक घेऊनही, जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात प्रत्यक्षात प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्याकडून कोणतीच कृती होत नसल्याचे मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर श्री. ठाकरे यांनी हे आश्वासन दिले.
याप्रसंगी कृती समितीचे सदस्य श्री. सुरेश यादव, श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, शिवसेना कागल तालुका प्रमुख श्री. अशोकराव पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta