Thursday , March 5 2026
Breaking News

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

Spread the love

 

मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा या आशयाचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला असून त्याला लवकरात लवकर मान्यता द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणार्‍या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने 16 नोव्हेंबर 2013 रोजी केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आवश्यक त्या निकषांची पूर्तता करीत असल्याचा निष्कर्ष या तज्ज्ञ समितीने काढला असून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
यासंदर्भात राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी यासंदर्भात सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेंतर्गत सुमारे एक लाख 20 हजारांहून अधिक पत्र राष्ट्रपतींना पाठविले आहेत. महाराष्ट्राच्या खासदारांनी वेळोवेळी याविषयी संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी 3 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यसभेत सांगितलं होतं. हा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे बर्‍याच कालवधीपासून प्रलंबीत असून त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *