Thursday , December 11 2025
Breaking News

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांना भेटून अजितदादांनी राजीनामा सुपुर्द केला आहे.

आजच मंत्रिमंडळाचा दुसरा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे एकूण 29 आमदार सोबत असल्याची चर्चा आहे. अजितदादांसोबत 7 ते 8 जण शपथ घेण्याची शक्यता आहे.

अखेर आज अजित पवारांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता आताच्या शपथविधीकडे आहे. आज मंत्रिमंडळ विस्तार होत असून मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. त्याची संपूर्ण तयारी झाले असून राजभवनातून शपथविधी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

अजित पवार यांनी बैठक घेतली होती, त्यावेळी त्यांच्यासोबत बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी , अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील आणि सरोज अहिरे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *