मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. पक्षातील काही प्रमुख नेते आणि अनेक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. जे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत, ते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्यासाठी एका मर्यादेपर्यंत थांबू, अनेक जण संभ्रमामुळे तिकडे गेले आहेत. ते सगळे जण मला फोन करत आहेत, सर्वजण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
जयंत पाटील पुढे म्हणाले, ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, ते आमदार परत एकदा राष्ट्रवादीमध्ये परतण्यासाठी एका मर्यादेपर्यंत थांबू. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेऊ, अनेक जण संभ्रमामुळे तिकडे गेले होते. ते सगळे मला फोन करत आहेत. सर्व जण शरद पवारांसोबत आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून कारवाई करण्यास सांगितलं आहे. निवडणूक आयोगाकडे आज तक्रार दाखल करणार आहोत. राष्ट्रवादीच्या आमदारांना 5 जुलैपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्याच दिवशी दोन्ही बैठकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोण कोणत्या बैठकीला जात ते बघू आणि करावाई करू असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta