कोल्हापूर : दहशतवादी असल्याच्या संशयावरून दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना अटक केली.
या दोघांनी आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती तपासात पुढे आले. त्यामुळे पुणे एटीएसच्या पाच जणांच्या पथकाने आंबोलीच्या जंगलात गुरुवारी (ता.२७) तपासणी केली. संशयित आरोपी याच परिसरात राहण्यास असल्याचे समजल्याने त्यांना मदत करणारे स्थानिक कोण, याचा तपास एटीएस करत आहे.
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुढे तपासात हे दोघे दहशतवादी कृत्य करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे यांच्याकडे कसून चौकशी केली असता हे दोघे काही काळ निपाणी, संकेश्वर येथे वास्तव्यास होते.
या दोघांनी आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केली असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे गुरुवारी (ता.२७) पाच जणांचे पथक पुण्यावरून आले होते. त्यांनी आंबोलीच्या जंगलात तपास केला. आरोपींना कोणी मदत केली, याचा शोध एटीएस घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta