
नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काल रात्री चार मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. यासह, या रुग्णालयातील मृत्यूची संख्या ४८ तासांत ३१ वर पोहोचली आहे, अशी माहिती ‘एनडीटीव्ही’ने मंगळवारी दिली.
मराठवाड्यातील प्रमुख शहर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही दुर्घटना घडली. एकूण मृतांमध्ये १६ नवजात बालकांचाही समावेश असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
नांदेडचे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने ही धक्कादायक घटना घडल्याचे बोलले जात आहे. हॉस्पिटलमध्ये 500 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे, परंतु येथे 1,200 हून अधिक रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.
48 तासात 16 नवजात बालकांचा मृत्यू झाला. प्रत्येकी सहा पुरुष आणि सहा महिलांचाही मृत्यू झाला. यातील अनेकजण सर्पदंशासाठी उपचार घेण्यासाठी आले होते, अशी माहिती नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डॉ. श्यामराव वाकोडे म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta