
माणगांव (नरेश पाटील) : अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय येथे माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माणगांव विकास आघाडीचे शिल्पकार राजीव साबळे यांनी बुधवार दि. 20 रोजी सायंकाळी 6.3० वाजता इफ्तार पार्टीचे
आयोजन केले आहे. सदर कार्यक्रम अशोकदादा विधी महाविद्यालयाचे प्रांगणात संपन्न होणार आहे. तसेच राजीवजी साबळे यांनी तमाम मुस्लिम बांधवांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकारिता विशेष निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर माननिय प्रांत अधिकारी प्रशाली दिघावकर, उपविभागिय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, तहसीलदार प्रियांका आयरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक आणि नगरसेविकाही उपस्थित असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिराजभाई परदेशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta